राज्यसेवा ही परिक्षा एकूण तीन टप्प्यांत घेण्यात येते
१) पूर्व परिक्षा – ४०० गुण
२) मुख्य परिक्षा ८०० गुण
३) मुलाखत – १०० गुण
पूर्व परीक्षेचे स्वरुप चाळणी परीक्षेचे असून त्यात आयोगाने निश्चित केलेल्या किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारा उमेदवार पूर्वपरीक्षेत पास होउन मुख्य परीक्षेसाठी निवडला जातो. पूर्व परीक्षेचे गुण अंतिम निकालात मोजत नाहीत.
पूर्वपरिक्षा अभ्यासक्रम :
पेपर १ – सामान्य अध्ययन : : (General Studies) ( गुण २००, प्रश्न १००)
पेपर २ – नागरी सेवा कल चाचणी (CSAT) (200 Marks, 80 Ques)
पेपर - १ | पेपर - २ |
---|---|
सामान्य अध्ययन हा पेपर निर्णायक | कल चाचणी पास होण्यासाठी ३३ टक्के (६६ गुण) आवश्यक. |
२०० गुण, वेळ २ तास | २०० गुण, वेळ २ तास |
मुख्य परिक्षा अभ्यासक्रम
प्रश्नपत्रिका – ६ अनिवार्य ( गुण – ८०० )
प्रश्न पत्रिकेचे स्वरुप: प्रस्तुत लेखी परिक्षेमध्ये खली नमूद केल्याप्रमाणे सहा अनिवार्य प्रश्नपत्रिका असतात.
पेपर क्रमांक १ – मराठी व इंग्रजी ( पारंपरिक / वर्णनात्मक )
भाग १ – मराठी ( एकूण गुण – ५० )
– निबंध लेखन – भाषांतर – सारांश लेखन
भाग २ – इंग्रजी ( एकूण गुण – ५० )
Essay writing – Translation – Precis writing
पेपर क्रमांक २ – मराठी व इंग्रजी ( वस्तुनिष्ट / बहुपर्यायी )
मराठी – ( एकूण गुण – ५० )
व्याकरण -आकलन
English – (Total Marks-50)
Grammar – Comprehension
इतिहास व भूगोल (Geography&History) (150 Marks) – (MCQs) – 2 hours
१ इतिहास (History)
२ भूगोल (Geography)
३ कृषि (Agriculture)
भारतीय संविधान व भारतीय राजकारण ( महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा
(150 Marks) – (MCQs) – 2 hours
मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क (150 Marks) – (MCQs) – 2 hours
1 – मानव संसाधन विभाग: (HUMAN RESOURCE DEVELOPMENT )
2 – मानवी हक्क :- (HUMAN RIGHTS)
अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र आणि कृषि, विज्ञान व तंत्रज्ञान विकास
(150 Marks) – (MCQs) – 2 hours
1 – अर्थव्यवस्था व नियोजन (ECONOMY AND PLANNING)
2 – विकास व कृषि यांचे अर्थशास्त्र (ECONOMICS OF DEVELOPMENT AND AGRICULTURE )
3 – विज्ञान व तंत्रज्ञान विकास (SCIENCE AND TECHNOLOGY DEVELOPMENTS)
मुलाखत (Interview)
मुख्य परिक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी पात्र ठरणार्या उमेदवारांच्या मुलाखती आयोगाच्या कार्यक्रमानुसार तसेच आयोगाने निश्चित केलेल्या ठिकाणी व वेळेस घेण्यात येतात. मुलाखत १०० गुणांची असते.
अंतिम निकाल
मुख्य परिक्षा आणि मुलाखती मध्ये प्राप्त केलेल्या गुणांची एकत्रित बेरीज करूँ गुणवत्ता क्रमानुसार अंतिम यादी तयार करण्यात येते.