Education

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)
(Maharashtra Public Service Commission)

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी राज्याच्या प्राशासकीय सेवांसाठी अधिकारी निवडीची परिक्षा घेते. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये राज्य लोकसेवा आयोग निर्माण केला असून घटनेच्या कलम ३२० अन्वये सेवक भरती व तय संबंधी सल्ला देण्याचे कार्य आयोग पार पाडतो. आयोग मार्फत विविध सेवांसाठी परिक्षा घेतल्या जातात. या सर्व स्पर्धा परिक्षा एमपीएससी / एमपीएससीची  परिक्षा या नावाने ओळखल्या जातात.

राज्यसेवा परीक्षेचे स्वरुप व निकष :-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगकडून राज्यातील विविध प्रशासकीय विभागात वर्ग-३ पासून वर्ग -१ पर्यंतच्या अधिकार्यांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाते. आयोगाच्यावतिने स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून राज्य सेवा परिक्षा, विक्रीकर, निरीक्षक परिक्षा. पोलिस उपनिरीक्षक परिक्षा, मंत्रालयीन सहायक, महाराष्ट्र वनसेवा परिक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परिक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा परिक्षा, न्यायालयीन सेवा परिक्षा, मोटर वाहन निरीक्षक परिक्षा, लिपिक-टंकलेखक परिक्षा आदि व सरळ सेवेतून विविध पदाच्या परिक्षा सामान्य राज्य सेवा चाचणी परिक्षा फ्गेतली जाते. तसेच प्रशासकीय सेवेतील विभागांतर्गत परिक्षा घेतल्या जातात. आयोगाच्या वतीने राज्यसेवा परिक्षे मधून अधिकारी होण्याकरीता पूर्व परिक्षा,  मुख्य परिक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यातुन जावे लागते. राज्यसेवा परिक्षेतुन राज्य शासनाच्या सेवेतील अतांत्रिक राजपत्रित गट -अ व ब या संवार्गातील पुढील पदे शासनाच्या मागणी नुसार व् पदांच्या उप्लाब्धे नुसार भरण्यात येतात.

राज्यसेवेतील पदे :-

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक, तहसीलदार, विक्रीकर अधिकारी वर्ग १, निबंधक वर्ग १ व २,

वित्त लेखाधिकारी वर्ग १ व २, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, उप मुख्याधिकारी, नायब तहसीलदार, सहायक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, मंत्रालय सहायक, लिपिक, या शिवाय आयोगामार्फात महाराष्ट वनसेवा, वरिष्ट आणि कनिष्ट लिपिक, दीवाणी न्यायाधीश वरिष्ट स्तर व् प्रथमश्रेणी, न्यायदंडाधिकारी, कर सहायक, पोलिस उपनिरीक्षक खात्यांतार्गात, पोलिस उपनिरीक्षक सरळसेवा, मोटर वाहन उपनिरीक्षक, विक्रीकर अधिकारी, सहायक,  लिपिक टंकलेखक आदि परिक्षा घेण्यात येतात.

सरळ सेवा

जिल्हा पाताळीवर जिल्हा निवड समितीच्या माध्यमातून काही पदे दरवर्षी भरली जातात. ज्याप्रमाणे गृह विभाग पोलिस, लिपिक, वनविभाग वनपाल, वनरक्षक आणि चालक. सार्वजानिक बांधकाम विभाग कनिष्ट आणि वरिष्ट लिपिक, अनुरेखक, कनिष्ट अभियंता, कृषि विभाग कृषि सेवक, कनिष्ट आणि वरिष्ट लिपिक, कृषि पर्यवेक्षक, भुमापन विभाग, भुमापक व कनिष्ट लिपिक, पाटबंधारे विभाग

कनिष्ट आणि वरिष्ट लिपिक, अनुरेखक, कनिष्ट अभियंता, आरोग्य विभाग आरोग्य सेवक, शिक्षण विभाग कनिष्ट आणि वरिष्ट लिपिक, महसूल विभाग तलाठी व् ग्रामसेवक यांच्या समावेश असतो.